¡Sorpréndeme!

Maharashtra Superfast News | महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या | 14 April 2025 | 3 PM | ABP Majha

2025-04-14 0 Dailymotion

ठाकरेंच्या शिवसेनेत दानवे विरुद्ध खैरे वाद पुन्हा टिपेला. अंबादास दानवे मोठे झाल्यासारखे वागतात खैरेंचा आरोप. अंबादास दानवेंमुळे शिवसेनेतील अनेक नेते फुटले, खैरेंची टिका.
खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एकाच मंचावर, एकीकडे पालकमंत्रिपदावरुन वाद सुरु असताना इमारत भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी दोघेही एकाच व्यासपीठावर, विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा दोघेही एकत्र.
रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन नाशिकचं पालकमंत्रिपद अडलं. कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांची पालकमंत्रिपदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता. कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजनांकडून याधीच नाशिक जिल्ह्यात कामाला सुरवात.
अमित शाह येऊनही रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय नाही, जयंत पाटलांचा टोला. तर विरोधी पक्षातील पाटलांनी काय बोलावं तो त्यांचा निर्णय, सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर. 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा नाराजी.चैत्यभूमीवर बोलायची संधी न मिळाल्याने शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहीती. मात्र आपण नाराज नाही, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. 
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा देखील इशारा.
इन्कम टॅक्स भरण्यात महाराष्ट्र 'नंबर वन', देशातील एकूण ९.१९ कोेटी करदात्यांनी भरला कर. एकट्या महाराष्ट्रानं १.३९ कोटींचा कर भरल्याची आकडेवारी समोर.